स्त्रीरोग, प्रसूती व अतिदक्षता सेवांसह एकाच छताखाली आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध

सावदा (लाला कोष्टी ) शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना महानगरांप्रमाणे दर्जेदार व अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या ध्येयातून उभारलेल्या ‘संज्योत हॉस्पिटल व क्रिटिकल केअर सेंटर’*च्या नवीन अत्याधुनिक वास्तूचे तसेच स्त्रीरोग व आधुनिक प्रसूती विभागाच्या विस्ताराचे उद्घाटन आज (दि. २३) सावदा येथे होत आहे.

सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि रुग्णांप्रती आत्मीयता या मूल्यांवर उभ्या राहिलेल्या या आरोग्यसेवेच्या केंद्रामागे सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. आशिष सरोदे आणि अनुभवी स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ. मोहिनी आशिष सरोदे यांचे मोलाचे योगदान आहे.
मूळ मस्कावद येथील असलेल्या डॉ. आशिष सरोदे यांनी मुंबईतील डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय व एमजीएम हॉस्पिटलमध्ये उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ म्हणून मोठा अनुभव संपादन केला. तर डॉ. मोहिनी सरोदे यांनी मुंबईतील केईएम हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल तसेच छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात कार्य करून स्त्रीरोग व प्रसूती क्षेत्रात व्यापक अनुभव मिळवला आहे.
महानगरांमध्ये उज्ज्वल कारकीर्द घडविण्याची संधी असतानाही दोघांनी ग्रामीण भागातील जनतेची सेवा करण्याचा निर्णय घेत सन २०१९ मध्ये सावदा येथे संज्योत हॉस्पिटलची स्थापना केली. आज हे रुग्णालय सावदा, रावेर, यावल, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव तसेच मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर परिसरातील नागरिकांसाठी विश्वासाचे आरोग्यकेंद्र बनले आहे.
रुग्णालयात हृदयविकार, मधुमेह, थायरॉईड, मेंदूविकार, श्वसनविकार, विषबाधा, मूत्रपिंड, यकृत व इतर गंभीर आजारांवर अचूक निदान व उपचार केले जातात. तसेच अत्याधुनिक आयसीयू, कार्डियाक मॉनिटर, सेंट्रलाइज्ड ऑक्सिजन, डिजिटल एक्स-रे, ईसीजी, नेब्युलायझर आणि आधुनिक पॅथॉलॉजी सुविधाही उपलब्ध आहेत.
डॉ. आशिष सरोदे हे विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेतही सक्रिय योगदान देत आहेत. ‘आरोग्यसेवा हा व्यवसाय नसून समाजसेवा आहे’ हा त्यांचा दृष्टिकोन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना स्वतःच्या परिसरातच उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याची त्यांची धडपड आज हजारो कुटुंबांसाठी वरदान ठरत आहे.
चौकट : एकाच छताखाली उपलब्ध सुविधा..!

स्त्रीरोग व प्रसूती विभाग
दुर्बिणीद्वारे (Laparoscopy) शस्त्रक्रिया
गर्भवती मातांची नियमित तपासणी व मार्गदर्शन
नॉर्मल डिलिव्हरी
सिझेरियन (C-Section)
उच्च जोखमीच्या गर्भधारणेचे व्यवस्थापन
मासिक पाळीच्या विकारांवर उपचार
किशोरवयीन मुलींच्या हार्मोनल समस्या
पांढऱ्या पाण्याच्या तक्रारींवर उपचार
वंध्यत्वाचे निदान व उपचार
स्तन विकार व कर्करोग तपासणी
गर्भाशयाच्या आजारांचे निदान व उपचार
सोनोग्राफी सुविधा
आधुनिक आरोग्य सुविधा
सुरक्षित व स्वच्छ वातावरण
कार्डियाक मॉनिटर
सेंट्रलाइज्ड ऑक्सिजन सुविधा
अद्ययावत ईसीजी मशीन
डिजिटल एक्स-रे
अत्याधुनिक अतिदक्षता विभाग (ICU)
प्रायव्हेट रूम्स
डिलक्स एसी रूम्स
प्रशस्त जनरल वॉर्ड
अत्याधुनिक पॅथॉलॉजी
‘सर्व सुविधा – एकाच छताखाली’
(फोटो : डॉ. आशिष सरोदे व डॉ. मोहिनी आशिष सरोदे)