Oplus_16908288

मा. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सावदा नगरपालिकेच्या कामकाजाचा व विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाचा घेतला आढावा

सावदा, दि. ३ जुलै २०२६ : रावेर दौऱ्याच्या निमित्ताने मा. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शासकीय विश्रामगृह, सावदा येथे सावदा नगरपरिषदेच्या विविध प्रशासकीय कामकाजाचा तसेच विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. भूषण वर्मा यांनी नगरपरिषदेच्या विविध विकासकामांची, नागरिकाभिमुख उपक्रमांची तसेच विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती सादर केली. विभागीय आयुक्तांनी कामकाजाचा आढावा घेत आवश्यक सूचना देत कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले.

या प्रसंगी मा. जिल्हाधिकारी, जळगाव, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव, मा. निवासी उपजिल्हाधिकारी, मा. प्रांताधिकारी, फैजपूर तसेच मा. तहसीलदार, रावेर उपस्थित होते.

बैठकीपूर्वी सावदा नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी श्री. भूषण वर्मा यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

सदर बैठकीत विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, मतदार नोंदणी प्रक्रियेतील अचूकता तसेच नगरपरिषदेच्या विविध प्रशासकीय कामकाजाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विभागीय आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन कामकाज अधिक गतिमान व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पार पाडण्याचे निर्देश दिले.