Oplus_16908288

प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीन गडकरी जी यांच्या मार्गदर्शनाखाली बुऱ्हानपूर-अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्गाची उभारणी वेगाने सुरू आहे. वाढती वाहतूक आणि शहरांमधील जागेची मर्यादा लक्षात घेऊन रावेर, यावल, फैजपूर व सावदा या शहरांना वळसा घालणाऱ्या बायपास मार्गाची रचना करण्यात आली आहे.

या बायपासमुळे शहरांतून जाणाऱ्या विद्यमान रस्त्यांच्या विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे शहरातील नागरिकांना दैनंदिन वाहतूक, व्यावसायिक व्यवहार आणि दळणवळणाच्या दृष्टीने अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत शहरांतर्गत समांतर रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांना मंजुरी प्राप्त झाली आहे.

या विकासकामांमुळे रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा शहरांतील अंतर्गत वाहतूक अधिक्त सथित मलभयाणि गतिमान होणार.